अण्णांचे म्हणजे माझ्या वडीलांचे १९८५ साली तरुण भारत मध्ये प्रसिद्ध झालेले हे सुभाषित. आजही ते प्रासंगिक आहे. आताही परिस्थिती तशीच आहे.
स्वातंत्र्यदिन
स्वातंत्र्यं स्वार्थात् मुक्तिः
त्यागात् स्नेहोऽभिजायते।
सौहार्दं सर्वराज्येषु
स्वातंत्र्यं राष्ट्रभावना॥
अर्थ : स्वातंत्र्य म्हणजे क्षुद्र स्वार्थापासून सुटका. अशा त्यागातूनच परस्परात स्नेहभाव निर्माण होतो. सर्वच राज्यांमध्ये परस्परांविषयी सद्भावना असायला हवी. आपण एक राष्ट्र आहो ही भावना म्हणजेच स्वातंत्र्य होय.
No comments:
Post a Comment