अध्याय नववा - राजविद्याराजगुह्ययोग
ऐकव गीते तुझी कहाणी, निर्मळ निर्मळ तुझी वाणी
तुम्ही ऐकता मन लावून याचे कौतुक वाटे मला
शब्दात जे ना मांडता येते सांगे भगवान पार्थाला
हरिदास झाला तो तर तरला त्याच्या भाग्या ना सीमा
राजविद्या ऐसी आगळी,द्यावी तरी कसली उपमा ?
वेदांचेही सार काढले मार्ग सोपा सांगितला
तुमच्या आमच्या अंत:करणात श्रीहरि आहे वसलेला
जी जी सेवा हातून घडते, तिच्यात असू दे ओलावा
लपवावे ना श्रीहरीपासून आंतरपाट सरकावा
मोक्ष मोकळा संगळ्यांसाठी नाही मक्ता कोणाचा
हलके मोठे कर्म नसते, काम करी तो भाग्याचा
पवित्र मन, भोळा भाव मग भक्ता अशक्य काय?
करता घडताकर्मच शुद्ध
सुमन होऊन पूजित पाय
सारे जीवन हरिमय
होते, संदेश आहे गीतेचा
अनुभव घ्यावा ज्याचा
त्याने श्रोता वक्ता भाग्याचा
हरि हरि म्हणणे येता
जाता कोमल मंजुळ हो वाणी
अंतर्बाह्य करते
निर्मळ गीता गंगेचे पाणी
येथे तेथे श्रीहरि
भरला चित्ती ठसू दे उदात्त भाव
अंत:करणात नीती स्फुरते,
भयशंकांचे नुरते नाव
सारी कर्मे सा-या क्रिया
भगवंताला करता अर्पण
कर्म भक्ती यांचा
मिलाफ जीवन होई स्वच्छ दर्पण
जीवनाचा ग्रंथ सुंदर
नसेल नसुदे मुद्रित झाला
जैसा चाचक तैसा आशय
ज्याला त्याला आहे कळला
रमत गमत वाटचाल करत जावी
परमार्थाची
संवादाची रुची घेत ऐका कहाणी गीतेची ऐका
कहाणी गीतेची
No comments:
Post a Comment