अध्याय आठवा – अक्षरब्रह्मयोग
ऐकव गीते तुझी कहाणी, निर्मळ निर्मळ तुझी वाणी
जे काही आपण पहातो, ऐकतो त्याचा ठसा उमटत
जातो
चांगले संस्कार घडत जावे, रामनाम मुखी यावे
जन्मभर जे काही केले, तशीच वासना होत गेली
गीतेच्या जर स्मरल्या ओळी, समजा भाग्ये
तीच दिवाळी
शेवट गोड सारे गोड म्हणून वाईट खोडी सोड
गोड बोल, मित्र जोड, भजनच भोजन गोड धोड
मरण येणार, कैसे चुकणार म्हणून नयेच होऊ
बेजार
स्मरण त्याचे असू द्यावे, नेमे ध्याना बसत
जावे
आला दिवस जातोच आहे, वाया जीवन जात आहे
काय मिळवले, काय जोडले, भरून आले अंती डोळे
नकाच विसरू चुकून मरणा, सत्कृत्याचा करा
भरणा
नाम देते अर्थ जीवना, संतोष होतो घरी पाहुणा
नाम स्वभाव सुधारत जाते, गोड बोलणे स्फुरत जाते
अपेय मुळीच पिणार नाही, शिवी तोंडी येणार
नाही
मना मोकळीक मिळणार नाही, नित्यनेम चुकणार
नाही
जोडू नाते समाजाशी, प्रेमे भिडू कर्तव्याशी
प्रत्येक दिवस एकादशी आत हसतो हृषीकेशी
यायचे तेव्हा येवो मरण अंतिम घडी गोड व्हावी
पुढचा विचार करू आधी, बाणवू अंगी गुण दैवी
पुनर्जन्म प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षण
भरपाईचा
जाणीव सुंदर परीस लाभे उरला जन्म सोनियाचा
जन्म गोपाल शैशव तो यौवन तैसे म्हातारपण
देहभोग, आप्तवियोग तोच गोपाळ आहे मरण
अहोरात्र झगडत जावे शिकवण ऐशी उत्साहाची
संवादाची रुची घेत ऐका कहाणी गीतेची ऐका
कहाणी गीतेची
No comments:
Post a Comment