Tuesday, September 1, 2015

आरती सत्यनारायणाची...


अण्णांनी लिहिलेल्या "सुजनहो सत्यच नारायण" मधील ही आरती.  गायली आहे माधुरी धर्माधिकारी यांनी आणि संगीत दिले आहे मोहिनीराज ओंकार यांनी.

आरती सत्यनारायणा गाऊ
विमला मति द्यावी श्रवणा! ध्रु.

कथा आपली निमित्त केवळ
भाविक मन होण्याला निर्मळ
अपार तव करूणा!१

नानारुपे धारण करता
भक्तकामना तुम्ही पुरवता
किती नामी योजना!२

देवापुढती समान सगळे
भेदाला नच स्थान कोठले
वितरत तुम्ही ज्ञाना!३

पूजा साधी प्रसाद सात्त्विक
तीर्थ प्राशितो प्रेमे भाविक
अश्रुपूर लोचना!४

एक एक गुण जोडत जावा
ऐक्यभाव तर सहज कळावा
सुलभ सुलभ साधना!५

श्रीरामा करि लिहवुनि घेता
कौतुक त्याचे तुम्ही करविता
किति सांगाव्या खुणा!६

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

1 comment:

  1. आरती छान आहे. म्हटली पण छान व संगीत पण छान धन्यवाद.

    ReplyDelete