जानेवारी १९७० च्या गीतादर्शन अंकात प्रसिद्ध झालेली श्रीराम आठवले यांची ही कविता…
करू समर्थ भारत देश! ध्रु.
विजयाची गाणी गाऊ
विजयाची गाणी गाऊ
विभवाची स्वप्ने पाहू
सुवर्णयुग पुनरपि आणू या -
होईल साह्य गणेश ! १
विज्ञान - कला ही दोन्ही
वाणिज्य-कृषी ही फिरुनी
वर्धापन यांचे होत सुनिश्चित
प्रसन्न जर यत्नेश ! २
विजिगीषु मनि मग आशा
प्रस्फुरेल पौरुष भाषा
कीर्ति सुगंधी राहिल पसरत
यावच्चन्द्र दिनेश ! ३
👆🏻 ऑडिओ
No comments:
Post a Comment