मोरया, ओवाळितो आरती । धृ
विशालपण नयनी भरले
तेज तनी तव रसरसलेले, मंगलमय मूर्ती ।।१।।
बाप्पा तुजला पदवी साजे
विघ्नहरा तव कीर्ती गाजे, लोकप्रिय भारती ।।२।।
काळालाही मूषक केले
सोंडेपरि मन आत मुरडले, योग्यांची युक्ती ।।३।।
तू व्यासांचा लेखक झाला
अबलांनाही केले सबला, त्रैलोक्यी कीर्ती ।।४।।
उच्चारहि तो ओंकाराचा
अनुभव देई सहवासाचा, नित्य नवी प्रगती ।।५।।
No comments:
Post a Comment