प्रसाद पुष्पे - स्वच्छता मोहीम!
आपण केर काढतो का? रोजच्या रोज? अगदी प्रत्येक खोलीचा? कोपऱ्यात साठून नाही ना राहात कधी?
तुमची स्वच्छते बाबतची जागरुकता अगदी कौतुकास्पद आहे. बरे पण आता विचार करु या आपल्याच मनाचा! तिथे कसला केर नाही ना साठला? पूर्वग्रहांचा - कामक्रोधाचा, संशयाचा, द्वेष मत्सराचा? नकळतच आपला हात गेला आपल्या नाकाकडे!
मनातली घाण पोटातल्या घाणीपेक्षाही वाईट! आरोग्य बिघडते ते त्यामुळे. पोट साफ करायला एरंडेल नाहीतर त्रिफळा चूर्ण! मन साफ रहायला - नामजप, ध्यान, सद्ग्रंथांचे श्रवण!
अहो मनाला जी गोडी लावावी, ती लागते. कालचा दिवस गेला निघून. मनाचे प्रदूषण थांबवायला दर दिवशी नव्याने वागायला सुरुवात करायची. चुका दक्षतेने टाळायच्या. बोलणे कमी करायचे, त्यात गोडवा आणायचा, वेगवेगळी टीव्ही चॅनेल्स, त्यावरच्या मालिका, चित्रपट (काही सन्माननीय अपवाद वगळता) म्हणजे पचनाला जड असे भेळीसारखे, पदार्थच, नकोतच ते.
चला जळमटे काढू या. भगवंताचे नाव घेऊ या. तुटायला आलेले भावबंध गोड बोलून, विधायक कृती करून, भगवंताची प्रार्थना करून दृढ करुया! आणि शेवटच्या श्वासापर्यंत विश्वास बाळगू या - भंगवंत दयाळू आहे! तो जे करील ते आपल्या हिताचेच करील! श्रीराम!
लेखक : श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:
Post a Comment