Sunday, April 28, 2019

देवाचा हा न्याय कसा?

देवाची जर सर्व लेकरे
देवाचा हा न्याय कसा?
दिव्यातळी अंधार कसा? ध्रु.
बाबा मी का माणूस नाही
मैत्रिभाव का मम मनि नाही
एक दूरचा एक जवळचा
मानत हा जगपिता कसा?१
सर्वांसाठी मधुरच पाणी
भास्कर तळपे समान गगनी
या लोकांचा धर्मच विपरित
माणुसकी विसरतो कसा?२
एकच धरती सगळ्यांसाठी
एक गगन हे डोईवरती
देवाच्या दुनियेत नसावा
ठाव तिळभरि दु:स्वासा!३
जे देवाला नच रुचणारे
ते आम्हाला नच पटणारे
द्या भेदाते मूठमाति अन्
कार्याचा उमटवा ठसा!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
३-४-१९६८

महात्मा फुले यांच्या चरित्रावर आधारित काव्यामधील एक कविता..

No comments:

Post a Comment