'तो आत्मा मी' असे चिंतिता होशिल सुखसामोरा!
घननीळाचे स्मरण कोवळे नाचवील मनमोरा!ध्रु.
घननीळाचे स्मरण कोवळे नाचवील मनमोरा!ध्रु.
कुमुददळांच्या ताटी
चंद्रकरांची दाटी
वाळूचे कण रुचतिल का कधी सांगा तया चकोरा?१
विषय अशाश्वत
देह न शाश्वत
विषयजनित सुख लाविल मागे सुखदुःखांचा फेरा!२
आत्मसुखाची गोडी
जाणवली जर थोडी
सोऽहंबोधी वृत्ति रंगता टळतिल येराझारा!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०१.०२.१९७४
(सांगे कुमुददळाचेनि ताटे
जो जेविला चंद्रकिरणे चोखटे
तो चकोरु काई वाळवंटे
चुंबितु असे?
या ज्ञानेश्वरीतील ओवीवर आधारित काव्य)
ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या स्वामी माधवनाथांच्या विवरणावर आधारित
No comments:
Post a Comment