अतूट नाते आहे माझे इथल्या मातीशी
हृदय मिळाले प्रेमे हृदया मन मग अवकाशी!ध्रु.
हृदय मिळाले प्रेमे हृदया मन मग अवकाशी!ध्रु.
घड्याळ बोले तसे हृदय हे टिक टिक करताहे
मौन पाळता नयन झाकता श्रवणी येताहे
ओळख पटली तसा नितू तू गालातच हसशी!१
जन्मामागुन जन्म लोटले टिकते ते नाते
सदेह किंवा विदेह याला महत्त्व ते नसते
पुढचे पाउल पुढे टाक तू मोठ्याने म्हणशी!२
आपण मांडके अश्वावरती बैठक ती ठाम
निर्धाराला पार पाडता होतो बेफाम
खूण असे ही पूर्ण सिद्धता झुंज झुंजण्यासी!३
जागोजागी वेळोवेळी दिसावेस तू नितू
स्मरणगाठ ही म्हणून बांधते शुद्ध शुद्ध हेतू
तुझे मनोरथ पूर्ण कराया बळ ये हाताशी!४
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२०.०५.२००६
No comments:
Post a Comment