जे कर्म आपल्या हातून होत राहील ते कर्म परिपूर्ण कसे होते? सिद्धी असिध्दीचा विचार न करता ते जर भगवंताला अर्पण केले तर सहजच ते परिपूर्ण होते. माझ्या हातून जे कर्म झाले ते ब्रह्मानेच केले असा भाव ठेवावा.
नित्य कर्मे- शरीर धारणेस आवश्यक असलेली कर्मे. नोकरी, धंदा, खाणे पिणे, उपासना इत्यादी.
नैमित्तिक कर्मे - उत्सव, जयंत्या श्राद्ध पक्ष इत्यादी व्रतवैकल्ये.
आपल्या वाटेला आलेली सहज नित्य व नैमित्तिक कर्मे फलाशा सोडून केवळ भगवत् प्रीत्यर्थ करावयाची.
कर्मचक्र भगवंतापासून सुरू होऊन भगवंताला मिळते. मी व माझे अडथळा दूर करावा. कर्माने भगवंत आपलासा होणे हीच त्याची त्या कर्माची परिपूर्ती होय-
-----------

हातुनि जे घडले- माधवा
तुवांच ते केले!ध्रु.
तडीस गेले तुझीच इच्छा
अपूर्ण जरि ते तुझीच इच्छा
हेच हेच कळले!१
भगवंता तव पदी समर्पण
नुरले माझे मुळीच तनमन
अश्रू ओघळले!२
उगम तुझ्यातुन अंत तुझ्यातच
कर्मगती ही चक्राकारच -
कर नकळत जुळले!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२८.०४.१९७८
(देखे जेतुलाले कर्म निपजे
तेतुले आदिपुरुषी अर्पिजे
तरी परिपूर्ण सहजे जाहले जाण
या ज्ञानेश्वरीतील ओवीवर आधारित काव्य)
ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या स्वामी माधवनाथांच्या विवरणावर आधारित
No comments:
Post a Comment