Sunday, May 14, 2023

लागु दे सोऽहं सोऽहं ध्यास

लागु दे सोऽहं सोऽहं ध्यास!ध्रु.

आसनावरी सुस्थिर बसुनी
अभ्यासामधि जावे रमुनी
खचितचि होइल भ्रांतिनिरास!१

ज्या विस्मरलो त्याते स्मरणे
सोऽहं सोऽहं सतत घोकणे
शांती करील हृदयि निवास!२

बंधन कुठले? द्वंद्व लोपले
आत्माकारच सगळे गमले
जीव- शिव संगम त्या समयास!३

भक्तहृदयि भगवंत येतसे
अंतर्मुख साधका दिसतसे
भाग्य ये अभ्यासे उदयास!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२०.०७.१९७४
मारुबिहाग, केरवा- कशी जाऊ मी वृंदावना


(जीव परमात्मा दोनी
बैसोनी ऐक्यासनी
जयाचिया हृदयभुवनी विराजती
या ज्ञानेश्वरीतील ओवीवर आधारित काव्य)
ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या स्वामी माधवनाथांच्या विवरणावर आधारित

No comments:

Post a Comment