देवा दान मला द्यावे -
जीवन उपासना व्हावे!ध्रु.
जीवन उपासना व्हावे!ध्रु.
उठता बसता आठव यावा
जीवनात या ' राम ' भरावा
कर्म सुबक व्हावे!१
जे जे भेटे मजला कोणी
तुझेच ' दर्शन' त्याच्यामधुनी
भजन करुनि घ्यावे!२
प्रपंचात परमार्थ घडावा
मी, माझेचा विसर पडावा
' तो मी ' उमजावे!३
कर्मफुले कृष्णास वाहता
गीताजीवन येते जगता
अनुभवास यावे!४
वासुदेव हा विषय असावा
गोविंदाचा छंद जडावा
मन उन्मन व्हावे!५
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२०.०९.१९८९
No comments:
Post a Comment