Sunday, May 21, 2023

सकल जिवांसी तारायासी अवतरली गीता!

सकल जिवांसी तारायासी अवतरली गीता!
अवतरली गीता!ध्रु.

साहित्याचे केले मंथन
आले लोणी सहजचि उसळुन 
मोह निरसिते, पथा लाविते करुणामयि माता!१

देह नव्हे मी, अव्यय आत्मा
स्थिरचरव्यापी तो परमात्मा
देहाहंकृति कणहि न उरवी श्रीभगवद्गीता! २

स्वकर्म करुनी हरिस अर्पिणे-
त्या सुमनांची माळ गुंफणे
करि मन निर्मळ, ज्ञानहि देई मातेची ममता!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१०.१२.१९७४
(हे गीतानाम विख्यात
सर्व वाङ्मयाचे मथित
आत्मा जेणे हस्तगत रत्न होय
या ज्ञानेश्वरीतील ओवी वर आधारित काव्य)
ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या स्वामी माधवनाथांच्या विवरणावर आधारित

No comments:

Post a Comment