Monday, May 22, 2023

चिरंजीव (डॉ) नीतू मांडके



चिरंजीव हा नितू मांडके चिरंजीव झाला
का हृदया याने हात जणू घातला!ध्रु.

डॉक्टर कसला हा रुग्णांचा होता सवंगडी
रडवी तोंडे हसरी होती फुटताक्षणि कोंडी
मनोमनी नितु भगवंताला थँक यू जणु वदला!१

बालपणा प्रौढत्वी जपला शिकवण शाळेची
व्रात्यपणा अति निकोप खूणच या भावेस्कुलची
तनमनबुद्धी तिन्ही कार्यरत वश धन्वंतरिला!२

भगवंताच्या राज्यामध्ये अवघड ना काही
माणुस परि बिघडवून ठेवी निसर्ग दे ग्वाही
निरगाठी सुरगाठी करता प्रवाह हो मोकळा!३

अशोक कोणा नितु कोणाला हा तर नचिकेता
यमधर्माच्या दारावर हा टकटक करि नुसता
दोघेही खळखळून असतिल हसले शुभ घडिला!४

ज्याने त्याने हवे जपाया घड्याळ हे आपले
संयम आस्था आस्तिकतांना हवे जतन केले
पूर्वग्रह भिरकावुन भेटो हृदयच हृदयाला!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
८.०६.२००३ 

No comments:

Post a Comment