शरणागत मजसी जो झाला
तो उद्धरिला, तो उद्धरिला!ध्रु.
तो उद्धरिला, तो उद्धरिला!ध्रु.
मजसी स्मरता, मज आळविता
माझेची गुण गाता गाता
स्थिर एक ठिकाणी जो झाला!१
वाममार्ग टाकुनी भजावे
पश्चात्तापे पावन व्हावे
मग साधक अति निकटी आला!२
पापी तरले, मार्गि लागले
नामस्मरणे जे गहिवरले
मम कीर्तनि जो रंगुनि गेला!३
माझे रूप जयाच्या नयनी
मन्नामा उच्चारी वाणी
प्रभुसेवा भूषण हो ज्याला!४
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१८.०३.१९७४
बिभास, त्रिताल
(जयाचिये वाचे माझे आलाप
दृष्टि भोगी माझेचि रूप
जयांचे मन संकल्प
माझेचि वाहे
माझिया कीर्तिविण
जयांचे रिते नाही श्रवण
जया सर्वांगी भूषण
माझी सेवा
या ज्ञानेश्वरीतील ओव्यांवर आधारित काव्य
ज्ञानेश्वरी ज्ञान किरणे या स्वामी माधव नाथांच्या प्रवचानावर आधारित)
No comments:
Post a Comment