Monday, May 22, 2023

हृदयस्थे प्रेरणा केली

हृदयस्थे प्रेरणा केली
तै लेखणी हाती धरली
झरझर झरल्या सुखद ओळी
विश्वासाच्या!१

आत्म्यावरती विश्वास
श्री सद्गुरूंचा निदिध्यास
बनवी नृसिंह माणसास
सांगे नीतू!२

नीतू मांडके जगन्मित्र
जगी हिंडला सर्वत्र
यशस्वी अरत्र परत्र
कीर्तिवंत!३

मांडकेची जी आखणी
शस्त्रक्रियेची मांडणी
रोग्याशी नात्याची जुळणी
अतुला ती!४

अलका त्याची सहचारिणी
सुखदुःखी सहभागिनी
नीतू तीचिया अंतःकरणी
ठसलेला!५

धन्वंतरी हवा ऐसा
ज्याचा जनतेला भरवसा
संरक्षक हा वाटे खासा
रोगग्रस्ता!६

करता करता काम होते
लढता लढता विजय भेटे
हसता हसता दुःख मिटे
भाविकाचे!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
३१.०१.२००९

No comments:

Post a Comment