Monday, May 8, 2023

जे जे उपजे ते ते नाशे - नाशले तरी पुनरपि दिसते!

जे जे उपजे ते ते नाशे -
नाशले तरी पुनरपि दिसते!ध्रु.

शोक कशाचा ?
जन्ममृत्युचा -
आत्मरूप परि अक्षय असते!१

देह विसर रे
अनंत स्मर रे
विस्मरणे तू खाशी गोते!२

चक्र असे ते
अविरत फिरते
शोक न करती कधी जाणते!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२७.०४.१९७८

(उपजे ते नाशे
नाशले पुनरपि दिसे
हे घटिकायंत्र जैसे
परिभ्रमे गा
ज्ञानेश्वरीतील या ओवीवर आधारित काव्य)
ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या स्वामी माधवनाथांच्या विवरणावर आधारित

No comments:

Post a Comment