Sunday, June 11, 2023

देव कसा?


देव कसा? मनि भाव जसा!ध्रु.

अंतरि आहे
विश्वी आहे
सहज वसे विश्वास असा!१

आनंदच हा
दिव्य भव्य हा
निळा- सावळा मेघ जसा!२

अनाम जरि हा
नामरूप हा
लावि नित ध्यास जसा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१७.१०.१९७७
यमन कल्याण, ताल केरवा
नाथ हा माझा

भगवंत आनंद आहे.  नाम ही आनंद रूपच आहे.

No comments:

Post a Comment