Sunday, June 18, 2023

तयाचे धन्य धन्य जीवन!

विषयांकडची धाव आवरुनि सावरि अपुले मन
तयाचे धन्य धन्य जीवन!ध्रु.

करीत असता विहित साधना
वेधू बघती विविध वासना
महावीर तो निर्धाराने निर्मळ राखी मन!१

धैर्य हवे हे युद्ध कराया
बल पुरवी सद्गुरु या समया
गुरुकृपा निज शिष्याला नित घेते सांभाळुन!२

मंथन करिता गरळ उसळले
आदिनाथ दिव्यास धावले
अमृतसिद्धी व्हावी म्हणुनी करिती विषप्राशन!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२८.११.१९७४
केरवा धुमाळी

(पहिलिया वैराग्य गरळा
धैर्यशंभु वोडवी गळा
तरि ज्ञानामृते सोहळा
पाहे येथे
या ज्ञानेश्वरीतील ओवीवर आधारित काव्य. स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या प्रवचन क्र. १७९ वर आधारित)

No comments:

Post a Comment