आम्ही बहुतचि भाग्याचे! आम्ही बहुतचि भाग्याचे!ध्रु.
ब्रह्मरसाचे जधि पारणे
पार्थालागी श्रीकृष्णाने
केले तेव्हा सहजपणाने-
पाहुणे ठरलो त्या घरचे!१
वत्स ठरतसे निमित्त केवळ
गोमाता दे गोरस निर्मळ
तिज ऐसी नच कोणी प्रेमळ
पोषण घडवी सकळांचे!२
ब्रह्मरसाचा घेता काढा
वारुनि जाती सगळ्या पीडा
मनी दरवळे धुंद केवडा
नुरतसे नाम वेदनांचे!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०६.०२.१९७४
बिहाग केरवा
(सहजे ब्रह्मरसाचे पारणे
केले अर्जुनालागी नारायणे
की तेचि अवसरी पाहुणे
पातलो आम्ही
या ज्ञानेश्वरीतील ओवीवर आधारित काव्य. स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे मधील प्रवचन क्रमांक ४५ वर आधारित)
No comments:
Post a Comment