साधके कमळासम व्हावे! ध्रु.
गीतारूपी चंद्र उगवता
अंतःकरणी भाव उमलता
प्रभुते आलिंगावे!१
पंकी जरी ते अलिप्त असते
स्थानी अपुल्या निवांत दिसते
जीवनि सहज असावे!२
देह हिंडता जनां दिसू दे
मनिची बैठक लव न ढळू दे
आत्मबोधि रंगावे!३
मन बुद्धी जर भगवच्चरणी
भगवद्दर्शन बसल्या स्थानी
ब्रह्मानंदि डुलावे!४
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२७.१२.१९७३
(का आपुला ठावो न सांडिता
अलिंगिजे चंद्रु प्रकटता
हा अनुरागु भोगिता
कुमुदिनी जाणे
या ज्ञानेश्वरीतील ओवीवर आधारित काव्य. स्वामी माधवनाथ यांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन क्रमांक ४ वर आधारित)
No comments:
Post a Comment