भगवंतांची उत्कट प्रीती असते भक्तावरती!ध्रु.
गजेंद्रधावा पडता कानी
आले धावत चक्रपाणी
उडी घातली जलात दिधली अपुल्या भक्ता मुक्ती!१
पार्थरथी सारथी जाहला
प्रेमकवच चढविले जयाला
राजसूय मखि स्वये काढिली संतजनांची उष्टी!२
देवापासुनि विभक्त नाही
तनेमने देवाचा राही
विकत घेतसे भक्त हरीला करुनि मधुरतम भक्ती!३
नवल प्रभूचे देखा देखा
उजळ करितसे ललाटरेखा
पार्थ जिथे श्रीकृष्णहि तेथे धर्मविजय ही नीती!४
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
३१.१२.१९७३
(देखा नवल तया प्रभूचे
अद्भुत प्रेम भक्ताचे
जे सारथ्यपण पार्थाचे
करितु असे
या ज्ञानेश्वरीेमधील ओवीवर आधारित काव्य. ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या स्वामी माधवनाथांच्या पुस्तकातील प्रवचन ८ वर आधारित काव्य.)
No comments:
Post a Comment