सोऽहं कळले ज्या जीवाला
सुखदुःखाचा स्पर्श न त्याला!ध्रु.
सुखदुःखाचा स्पर्श न त्याला!ध्रु.
देहाशी तादात्म्य पावता
सुखदुःखाचे भोग भोगता
जीव भाबडा भ्रमला भ्रमला!१
क्षणभंगुर या देहासाठी
किती करावी आटाआटी
जन्मच सगळा वाया गेला!२
आत्मरूप जीवाने व्हावे
सोऽहं बोधावरती यावे
अद्वैतामृत प्राशायाला!३
गुरुकृपा जधि जीवावरती
शरीरभाव ही सकल नासती
कृतार्थ जीवन त्या समयाला!४
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१२.०१.१९७४
(तै शरीरभाव नासती
इंद्रिये विषय विसरती
जै सोऽहं भाव प्रतीति
प्रगट होय
इंद्रिये विषय विसरती
जै सोऽहं भाव प्रतीति
प्रगट होय
या ज्ञानेश्वरीतील ओवी वर आधारित काव्य. ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या स्वामी माधवनाथांच्या प्रवचन क्र २० वर आधारित.)
No comments:
Post a Comment