जाग भारता -
शिवरायांचा प्रताप आठव रे!ध्रु.
शिवरायांचा प्रताप आठव रे!ध्रु.
"यत्न देव" जाणला जाणला
एक एक मिळविला मावळा
"स्वराज्य व्हावे" मंत्र घुमविला
तोरण बांधुन रे!१
दुष्ट वासना मनी चेतली
अफजलखाँ ची स्वारी आली
सावधानता विजयी झाली
खाना मारुनि रे!२
जसा कालिया डोही शिरला
महालात शाहिस्ता वसला
त्या दैत्याही धडा शिकविला
बोटे तोडुनि रे!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२४.०४.१९८१
No comments:
Post a Comment