Sunday, June 4, 2023

आत्मरूप होणे ध्येय साधकाला

आत्मरूप होणे ध्येय साधकाला!ध्रु.

जन्म- मृत्यु नाही मजला -
स्तुतिनिंदा लेप न कसला
राम सर्व ठायि आहे भरुनि राहिलेला!१

त्रिगुणात्मक प्रकृति बनली
गुंते नर नकळत जाली
अहंकार निरसन होता, मार्ग खुला झाला!२

अभेदत्व अंगी यावे
विश्वरूप मनि विकसावे
हेच भजन दिव्या दृष्टी देत साधकाला!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०२.१०.१९७४

म्हणोनि विश्वपण जावे
मग माते घेयावे
तैसा नव्हे आघवे
सकटचि मी

ऐसेनि माते जाणिजे
ते अव्यभिचारी भक्ति म्हणिजे
येथ भेद काही देखिजे
तरि व्यभिचारु तो

या ज्ञानेश्वरीतील ओव्यांवर आधारित काव्य. ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या स्वामी माधवनाथांच्या प्रवचन क्र. १३९ वर आधारित)

No comments:

Post a Comment