गीता कृपा द्वादशी
मला लढायचे नाही अर्जुनाचा वेडा हट्ट
पार्थसारथी सोडेना धरी मनगट घट्ट १
तुला लढावे लागेल तुझा स्वभाव शूराचा
धर चापबाण हाती पाठिराखा हो धर्माचा २
साधुसंतांना रक्षाया दुर्जनांना दंडाया
घडी धर्माची घालाया आलो पार्था धरेवर ३
काय करी अवतार जर नसे सहकार
घेई आधी पुढाकार तोच आदर्श होणार ४
कंसवध नव्हे हिंसा भक्त करती प्रशंसा
तुला घेणे हाच वसा मला तुझाच भरवसा ५
मन येण्या थार्यावर खाली नेटाने बसावे
अंतरात रमावर त्याचे दर्शन सेवावे ६
बुद्धी अचला निर्मला फळ गोड साधनेचे
संतसाहित्याचे वेच शेलकेच कही वेचे ७
ज्याला ध्यानाची आवड त्याच्या बुद्धीलागी धार
मन बुद्धी एकाकार त्याचा जय निरंतर ८
देव दाखवा दाखवा नाही कोठे विचारावा
अंतरातला जो ठेवा कसा करंट्याला ठावा ९
विश्वरूप सूक्ष्मरूप सौंम्यरूप उग्ररूप
सारे सारे एकरूप ज्ञाने जो तो सुखरूप १०
देव भावाचा भुकेला दीनाघरी धावलेला
पुंडलीका भेटीसाठी विठू विटेवर ठेला ११
कर्तव्यातला ओलावा छावेमधाला गारवा
सोऽहं घुमतसे पावा अनुभव स्वये घ्यावा १२
No comments:
Post a Comment