"नारायण नारायण" मंत्र जपावा
मुक्तीचा मंत्र हाच ओठी असावा । धृ
नारायण नारायण जपत राहावे
विश्वच हे भक्ताला हरिमय व्हावे
नारायण नाम हाच परम विसावा ।
द्वेषाला द्वेषच फळ प्रेमाला प्रेम
आत्म्याच्या चिंतनास नामगान नेम
भजने नर नारायण सहज घडावा ।
सत्याचा आग्रह हा निर्भय बनवी
देहाचा देहपणा निमिषि लोपवी
नारायण नामाचा छंद जडावा ।
नामी या बळ प्रचंड दिव्य औषधी
ती घेता काय करत आधिव्याधी
प्रल्हादहि सकळांचा बंधु बनावा ।
द्रव्याचे सत्तेचे मद्य कशाला ?
नामी जो बुडलेला तो तर तरला
'मी विष्णु' अनुभव हा सहज मिळावा ।
# श्री सद्गुरु नारायण महाराज, बेट केडगाव
No comments:
Post a Comment