Monday, March 7, 2016

शिवस्मरण..



ॐ नमः शिवाय
ॐ नमः शिवाय ।।ध्रु॥

सदाशिवाचे नाव मुखी
तो नर जाणा सदा सुखी 
चिंतन शुद्ध उपाय ।।१।। 

शुभ चिंतावे अशुभ पळे 
शुभ बोलावे स्नेह जुळे 
कृती न वाया जाय ।।२।।

पश्चातापे पाप जळे 
सोऽहं तो मी कळे वळे 
धरा शिवाचे पाय ।।३।।

सद्विचार सत्यच गंगा 
मंगल बनवी अखिल जना 
भूक भागवी गाय ।।४।।

अभ्यासाला बैसावे 
मन पवनाला जोडावे 
पुलकित होई काय ।।५।।

शिव घे अपुला कैवार 
सहज घडे आत्मोद्धार 
जीवन धर्मादाय ।।६।।

अंतरात शिव वास करी 
अरे जिवा तू पहा तरी 
द्वैत लयाला जाय ।।७।।

चंचल मन देते खेद 
स्थिर मन मावळती भेद 
नामस्मरण उपाय ।।८।।

ॐ नमः शिवाय

👆🏻 ऑडिओ