१९८५ मध्ये महाराष्ट्र राज्य दिनानिमित्त तरुण भारत मध्ये माझ्या वडीलांनी म्हणजे श्रीराम बाळकृष्ण आठवले यांनी लिहिलेले हे सुभाषित.
इयं सन्तभूमिस्तथा युद्धभूमि:
इयं नाट्यभूमिस्तथा धान्यभूमि:
महाराष्ट्रनाम्ना प्रसिद्धा प्रशाला
इयं खड़्गहस्तो भवेत् प्रार्थना ॥
अर्थ : आपला महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. येथे वेळोवेळी युद्धे झालीत. ही जशी नाट्यभूमी आहे तशीच कृषीभूमी सुद्धा आहेच. एक प्रकारे जीवनातील विविध अंगांचे अध्यापन करणारी ही प्रसिद्ध प्रशालाच. आपले महाराष्ट्र राज्य आता भारतभूमीचा खड्गहस्त होऊ दे हीच प्रार्थना.
No comments:
Post a Comment