पावस गाव, पावस गाव
मनि भरले हे पावस गाव ! ध्रु.
श्रीगुरु वसती भक्तांसाठी
माउलीपरी करती प्रीती
भवाब्धिपतिता होती नाव ! १
क्षेत्र भूवरी अती मनोहर
अतीव सुखकर पापतापहर
दुःखाला नच जेथे वाव ! २
इथे वनश्री नटली थटली
इथे साधका दिसे वाटुली
घेई मनाचा लवकर ठाव! ३
निर्मल वाहे तटिनी येथे
ये पावनता माहेराते
म्हणुनि चित्त घे येथे धाव! ४
अध्यात्माचा स्वर्ग नांदतो
आत्मानंदी यती रंगतो
जेथे उसळत भक्तीभाव! ५
ध्यानाला कधी खंड पडेना
विकल्पास मनि वाव उरेना
कुवासनांते करि मज्जाव! ६
निर्वातीचा दीपु न हाले
सोsहं सोsहं चिंतन चाले
देहमंदिरी दिसला राव! ७
आम्ही अमुचे भाव न उरती
तुम्ही तुमचे भाव उमलती
नाथपंथिचे उजळत नाव! ८
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१९७३
No comments:
Post a Comment