Wednesday, May 28, 2014

स्वातंत्र्यवीर सावरकर - सुभाषित


समग्र जीवनं यस्य
यज्ञज्वालेव  तेजसं 
वीरं विनायकं स्मृत्वा 
स्फूर्तिं प्राप्नोतु भारतः ।। 

अर्थ : ज्यांचे संपूर्ण जीवन यज्ञाच्या ज्वालेप्रमाणे तेजोमय होते अशा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचे स्मरण करून भारताला स्फूर्ती प्राप्त होऊ दे. 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

Sunday, May 18, 2014

ती काँग्रेस दिसेल पुन्हा?


२२ डिसेंबर १९८५ रोजी तरुण भारत मध्ये प्रसिद्ध झालेले हे सुभाषित.  हे सुभाषित तेव्हा कोणत्या संदर्भात लिहिले होते माहित नाही पण आत्ताच्या निवडणुकांच्या निकालानंतर माझ्या वाचण्यात आले म्हणून येथे परत देत आहे 

ती काँग्रेस दिसेल पुन्हा? 

प्रसारिता राष्ट्रस्य भावना 
मोक्षाकांक्षा यया वर्धिता 
त्यागशालिनी ऐक्यवर्धिनी 
कदा दृश्यते 'राष्ट्रसभा' सा ?

अर्थ 

हिंदुस्तान एक राष्ट्र आहे अशी भावना जोपासणारी, राष्ट्राच्या संपूर्ण स्वातंत्र्याची आकांक्षा जनमानसात जागविणारी, त्यागी आणि ऐक्य प्रस्थापित करणारी कॉंग्रेस कधी बरे दिसेल?
 

Sunday, May 4, 2014

शंकराचार्य वंदना

वैशाख शुद्ध पंचमी (शंकराचार्य जयंती) निमित्त १९८४ साली तरुण भारत मध्ये प्रसिद्ध झालेले हे सुभाषित :

शंकराचार्य वंदना

शंकराचार्य वन्देऽहम्
ज्ञानभास्कर ज्ञानद
वेदधर्मस्त्वया देव
तेजस्वी सपदि कृतः ॥

अर्थ : हे ज्ञानसूर्या, ज्ञान देणार्‍या शंकराचार्या, वैदिक धर्माला अत्यंत लवकर आपण तेजस्वी केलेत - म्हणून हे वेदमहर्षे वेददेवा, मी तुम्हाला वंदन करतो.

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

Thursday, May 1, 2014

महाराष्ट्र राज्य दिन


१९८५ मध्ये महाराष्ट्र राज्य दिनानिमित्त तरुण भारत मध्ये माझ्या वडीलांनी म्हणजे श्रीराम बाळकृष्ण आठवले यांनी लिहिलेले हे सुभाषित.


इयं सन्तभूमिस्तथा युद्धभूमि:
इयं नाट्यभूमिस्तथा धान्यभूमि:
महाराष्ट्रनाम्ना प्रसिद्धा प्रशाला
इयं खड़्गहस्तो भवेत् प्रार्थना ॥

अर्थ : आपला महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे.  येथे वेळोवेळी युद्धे झालीत.  ही जशी नाट्यभूमी आहे तशीच कृषीभूमी सुद्धा आहेच.  एक प्रकारे जीवनातील विविध अंगांचे अध्यापन करणारी ही प्रसिद्ध प्रशालाच.  आपले महाराष्ट्र राज्य आता भारतभूमीचा खड्गहस्त होऊ दे हीच प्रार्थना.