Friday, August 29, 2014

गणेश चतुर्थी


गणेश चतुर्थी

सर्वे विघ्ना विनश्यन्तु
सर्वे जानन्तु जीवनम् ।
मोदं ददानं हेरम्बम्
गणेशं प्रार्थयामहे ॥

अर्थ :  सर्व विघ्ने नष्ट होऊ देत.  जीवनाचे महत्त्व सगळ्यांच्या ध्यानी येऊ दे. मोदाचे - आनंदाचे वितरण करणार्‍या हेरंबाला - श्री गणेशाला आम्ही अशी प्रार्थना करतो.

Sunday, August 10, 2014

संस्कृत भाषा गौरव

संस्कृत भाषा गौरव 


प्रमोदनाय संस्कृतम्
प्रकाशनाय संस्कृतम् ।
प्रबोधनाय संस्कृतम्
समाष्टिरूप संस्कृतम् ।।

अर्थ : अत्यंत उदात्त आनंद देण्यासाठी संस्कृत भाषा आहे.  अंधार आहे तेथे प्रकाश पाडण्यासाठी संस्कृत आहे.  थोर थोर तत्वे उमगण्यासाठी संस्कृत आहे.  किंबहुना व्यक्ती व्यक्ती एकत्र आणून संघरूप होण्यासाठीच संस्कृत भाषा आहे.

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

Friday, August 1, 2014

गाउ या टिळकांचे गुणगान


सान थोर या, राव रंक या
अवघे जन या या
गाउ या टिळकांचे गुणगान ॥ध्रु॥

भारतभूच्या उजळ ललाटी
’तिलक’ शोभला अक्षयकीर्ती
रत्नागिरीच्या खाणीमधुनी
झळके रत्न महान ॥१॥

’गंगाधर’ विद्यांचे आगर
’पार्वती’चेही तप दारुणतर
रविराजाच्या कृपाप्रसादे
पुत्रहि तेजोमान ॥२॥

सह्याद्रीच्या गिरिकुहरातुन
घुमे ’केसरी’चे घनगर्जन
राष्ट्राची जागली ’अस्मिता’
उफाळला अभिमान ॥३॥

मंडालेच्या सुदूर विजनी
स्थितप्रज्ञ रत गहनचिंतनी
कर्मयोगि हा लिहून गेला
गीताभाष्य महान ॥४॥

जन्मसिद्ध हक्कास्तव झटला
’स्वराज्य’ व्हावे ध्यास घेतला
यज्ञाची धगधगती ज्वाळा
उजळवि नभोवितान ॥५॥
गाउ या टिळकांचे गुणगान !