मानवो माधवो भवेत्
गीता मूर्ति: माधवस्य मुरली मनमोहिनी ।
दृष्ट्वा श्रुत्वा पराभक्त्या मानवो माधवो भवेत् ॥
अर्थ : गीता ही माधवाची वाङमयी मूर्ती आहे, मनाला मोहविणारी मुरली आहे. तिचे अत्यंत श्रद्धेने दर्शन घेऊन, श्रवण करून, नराचा नारायण व्हावा. मानवाचा माधव व्हावा.