अध्याय तिसरा - कर्म योग
ऐकव गीते तुझी कहाणी निर्मळ निर्मळ तुझी वाणी
अर्जुन मोठा खट्याळ होता कर्मच टाकू पहात होता
लोभच सोडला फलाचा लेप न लागे कर्माचा
’मी कर्ता’ हे विसरून जा आनंद आगळा मिळवत जा
दिवा दिव्याने लागे जसा सत्कर्माचा खोल ठसा
कर्म ऐसे सहज घडावे टक लावून बघत राहावे
वाढे जैसी तन्मयता सुटतो बघ सगळा गुंता
मना उलटता होते नाम कर्मही घडते ते निष्काम
कर्मा दे भक्तीची जोड जीवन वाटे बघ बहु गोड
अन्न जसे जगण्याकरिता कर्म तसे देहाकरिता
अत्यावश्यक हे युद्ध धनंजया हो कटिबद्ध
पराक्रमाची शर्थ करी आत्मोन्नति रे तुझ्या करी
ऐकत जो गीतावचने त्याच्या भाग्या काय उणे?
संग सोडूनी कर्म करी यज्ञ करी हे ध्यानी धरी
जबाबदारी जो जाणे त्याला ना कधी पडे उणे
विकास कर्माने करता नरजन्माला सार्थकता
वडीलधारे जे करती इतर लोक ते अनुसरती
आळसास का द्या थारा उद्योगाने पोट भरा
कामक्रोधच शत्रु खरे शत्रुंजय त्या संहारे
धर्मरक्षणा झुंजावे दैत्यांना निर्दालावे
हातपाय नच गाळावे आत्मबला जोपासावे
गीता मातांची माता ती कळते गाता गाता
जुळले नाते आईचे प्रेमाचे पुण्याईचे
संवादाची घेत रुची ऐका कहाणी गीतेची, ऐका कहाणी गीतेची
No comments:
Post a Comment