Sunday, October 4, 2015

आरती गाऊ आरती गाऊ मंगलमूर्तीची - "गीत गणेशायन"

आरती गाऊ आरती गाऊ मंगलमूर्तीची -
"गीत गणेशायन"
कवि : श्रीराम बाळकृष्ण आठवले
संगीतकार : मोहिनीराज ओंकार

आरती गाऊआरती गाऊ मंगलमूर्तीची ।।ध्रु।।
तो सुखकर्ता,
तो दुखहर्ता
गजाननासी स्‍मरता वार्ता नुरेच विघ्‍नाची ।।१।।
हा लंबोदर
हा पीतांबर
सुवर्णसिंहासनी शोभली स्‍वारी ही श्रींची ।।२।।
शुंडा हलवी,
वेधुच लावी
वरदहस्‍त पाहता न पुरते घणि या नयनांची ।।३।।
गिरिजात्‍मज हा
शिवनंदन हा
भालचंद्र हा मने जिंकितो अवघ्‍या भक्‍तांची ।।४।।
ब्रह्मरसाचा -
मोदक साचा
झळाळती किति रत्‍ने यांच्‍या सुवर्णमुकुटाची ।।५ ।।
गणेश गावा,
गणेश घ्‍यावा
झांज झणझणे झडे चौघडा झुंबड भक्‍तांची ।।६।।
श्री गजानन
जय गजानन
श्रीरामासी गोडी लागे याच गजराची ।।७।।

1 comment:

  1. एकदम सुंदर आणि सोपी काव्यरचना आणि त्याला सुमधुर चाल.

    ReplyDelete