"गीत गणेशायन"
कवि : श्रीराम बाळकृष्ण आठवले
संगीतकार : मोहिनीराज ओंकार
युद्धामध्ये कधी यश येते तर कधी अपयश! पण यशाने हुरळून जाऊ नये, की अपयशाने खचू पण नाते. मन कसं मेरूसारखं अविचल राहायला हवं. अहंभावापेक्षा भक्तिभाव उपयोगी पडतो. कर्ता करविता भगवंत. कर्म त्याचे, मग फळ सुद्धा त्याचे. काशीराज आणि त्याचे अनुयायी यांना महोत्कट विनायकाला आळविण्याचा प्रसंग आला- विनायका तुझ्या चरणी आम्ही लीन झालो आहो.
महोत्कटा हे विनायका
महोत्कटा हे विनायका!ध्रु.
श्रद्धाबल हे तूच दे
स्थैर्य धैर्य तूच दे
विचलित मन हे होत का?१
यश आले हर्ष किती
अपयश ये खेद किती
चंचलता ही छळत फुका!२
हीनदीन झालो जर
तिमिरव्याप्त हे अंबर
नरक असे अन्य का?३
अहंभाव विरव विरव
भक्तिभाव फुलव फुलव
प्रकाश दे तू विनायका!४
नेतृत्वा नाहि तुला
हे अमिता, हे अतुला
वंदितो मी विनायका!५
महोत्कटा हे विनायका
महोत्कटा हे विनायका!ध्रु.
श्रद्धाबल हे तूच दे
स्थैर्य धैर्य तूच दे
विचलित मन हे होत का?१
यश आले हर्ष किती
अपयश ये खेद किती
चंचलता ही छळत फुका!२
हीनदीन झालो जर
तिमिरव्याप्त हे अंबर
नरक असे अन्य का?३
अहंभाव विरव विरव
भक्तिभाव फुलव फुलव
प्रकाश दे तू विनायका!४
नेतृत्वा नाहि तुला
हे अमिता, हे अतुला
वंदितो मी विनायका!५
No comments:
Post a Comment