अध्याय १४ : गुणत्रयविभागयोग
सत्व रज तम हे ते तीन गुण
जीव होई बद्ध आसक्तीने ।।१।।
चाले कुरघोडी त्यांची आपसात
तालावर जग त्यांच्या नाचे ।।२।।
सत्व निर्मलता रज हा लोभाचा
तम अज्ञानाचा जाण पार्था ।।३।।
आत वळविता मन पवनाला
पवन नामाला जुळतसे ।।४।।
तो मी पटे सत्य लाभ मोठा झाला
गुणांच्या अतीत व्हावे आधी ।।५।।
स्वरुपानंदात रमूनि जा बाळा
सद्गुरु आदेश देती भक्ता ।।६।।
No comments:
Post a Comment