Tuesday, February 17, 2015

सदाशिवा मी शरण तुला !


ॐ नमः शिवाय

सदाशिवा मी शरण तुला !
शरण तुला दे अभय मला ! ध्रु.

निर्धन असशी तरी आनंदी
तुला शोभते वाहन नंदी
नागही  कंठी तव रुळला ।। १ ।।

डम डम डम डम  डमरु वाजे
काळा वरती सत्ता गाजे
हे नटराजा नमन तुला ।। २ ।।

आदिनाथ  तू तूच महेश्वर
फणिवरधर तू तू व्याघ्रांबर
शिकवी मजला योग कला ।। ३ ।।

कमंडलूतिल गंगा दे रे
भाविकास सत्संगा दे रे
ने एकांती नित्य मला ।। ४ ।।

संघटनेचा मंत्र शिकव रे
भूतनाथ मज प्रेम पुरव रे
करवुन घे तव कार्याला ।। ५ ।।

स्मशानवासी लाव विभूती
पळवुन लावी सगळ्या खंती
अनासक्त तू कर मजला ।। ६ ।।

**** 

No comments:

Post a Comment