आरति हनुमन्ता, बलवन्ता
रामाच्या दूता ।
सत्कार्यास्तव उभ्या भारता
तू स्फूर्तीदाता । धृ
दास जसा तू, वीर तसा तू,
पंडित जैसा, गणनायक तू
सत्राणे उड्डाणे करती
भयचकीत चित्ता । १
झेप घेतली रविबिंबावर
ढळली धरती, घुमले अंबर
अपूर्व शैशव प्रभंजना हे
प्रणाम धीमंता । २
दूतांमध्ये तूच अग्रणी
बुद्धिमंत तू जग वाखाणी
शोधलीस तू अचूक सीता
रामनाम ऐकता । ३
भक्त खरा जो देवच झाला
वेगळा न तो कणही उरला
रामदास तू पहिला वहिला
पूर्णा श्रीमन्ता । ४
जवळी श्रीरामाच्या नेई
रामकृपा तू मिळवुन देई
दास्य भक्ति हातून घडावी
आस हीच आता । ५
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
No comments:
Post a Comment