प्रसाद पुष्पे - त्रिगुणांचा हा खेळ चालला.
तमोगुणाचे वैशिष्ट्यच हे की माणूस मोहाने आंधळा होतो - विकारवश होऊन त्याचा अधःपात होतो. सगळे त्याची कीव करतात. जगात छी:थू होते.
मातीत खेळायचा स्वभाव जाता जात नाही. अंग आणि अंगाबरोबर मनही मलीन होते याची जाण नाही. किती पुटांवर पुटं चढतात.
ती जाण कोणी करून दिली तरच एखाद्या भाग्याच्या क्षणी पश्चात्ताप होऊन पुनर्जन्म व्हायचा. वाल्याच्या जीवनात तो क्षण आला, खडतर तप केले आणि महाकवी वाल्मीकी बनला.
मध्ये तिष्ठन्ति राजसा:।
आपण बहुधा मधल्या दर्जाचे असू अशी समजूत करून घ्यायची आपण, आणि उर्ध्वम् गच्छंति सत्त्वस्था:।
नामस्मरण, सद्ग्रंथ श्रवण, ध्यान यांची गोडी मनाला लावून घ्यावी. अभिरुची चांगली होईल आणि चिखलात लोळणे नकळतच बंद होईल.
गीता वाचा, स्वतःची योग्यता जाणा, वाढवा. त्यातले विचार आत्मसात करा आणि श्रीकृष्णाचे खरेखुरे भक्त होऊन ध्येयासाठी सुखदुःखांचे आघात सहन करीत दिव्य जीवन जगा.
- श्रीराम बाळकृष्ण आठवले.

No comments:
Post a Comment