आज शिवा जिवलगास मुकला
गड आला पण सिंह चालला ss
सिंह चालला! ध्रु.
लगिन राहिले जरी रायाचे
भान नरवीरा तुला कोठचे?
कोंडाण्यावर जीवभाव त्वां ओवाळुनि टाकला
गड आला पण सिंह चालला,
सिंह चालला!
क्षात्रगौरवा गुणगंभीरा
सुभेदार घ्या माझा मुजरा
जाताना कीर्तिच्या मंदिली विजयतुरा खोविला
गड आला पण सिंह चालला,
सिंह चालला!
गेला बाजी, मुरारबाजी
पुढे चालला हा तानाजी
धन्य तुम्ही रण शयनी निजण्या मान तुम्हां लाभला
गड आला पण सिंह चालला,
सिंह चालला!
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
No comments:
Post a Comment