स्वामी माधवनाथांचा प्रसाद मज लाभला
किरणांच्या प्रकाशात वाटचाल करी मुला
साधनेची वाट सोपी गोडी वाढो तिची मनी
सोsहं ध्यानी रमावे तू कोठेही जा जनी वनी
आशीर्वाद प्रभावी हा पाठ राखी सदा कदा
देहबुद्धी घालवी तो लाभ याहून कोणता
आता नाही कुठे जाणे आसनी स्वस्थ बैसणे
पाहताना स्वरूपाला शांत होणे तने मने
कुणी वंदो कुणी निंदो कुरवाळो पिटो कुणी
उपाधींची नसे चिंता आकाशासम होत मी
सुधास्रोत असे आत अभ्यासी पूर्ण जाणवे
त्याचा लाभ तना होत कर्तव्यी ना पडे उणे
ईश्र्वरार्पण वृत्तीही साधका उपकारक
अद्वैत बोध आतूनी श्रीरामा उपकारक
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१७.०१.१९८६
No comments:
Post a Comment