Thursday, March 3, 2022

मीराबाई

कुणी काही म्हणा
मी मीरा आहे गोविंदाची! ध्रु.

गोविंदाचे गुण मी गाते
त्याच्यापुढती नाच नाचते
भावच भक्ता असते भूषण
चाड न जनरीतीची!१

अंतःकरणी हरि प्रकटला
कसा विस्मरू सुखद सोहळा
नामामृत नित प्राशन करते
मीरा श्रीकृष्णाची!२

चोरी कसली केली नाही
कुकर्म हातून घडले नाही
जगताची मज नसेच पर्वा
दासी भगवंताची!३

विष प्याले ते अमृत झाले
भजनामध्ये डोल डोलले
गिरिधारी हा विघ्न निवारी
सदैव मीरा त्याची!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१३.१२.१९८९

No comments:

Post a Comment