Tuesday, April 5, 2022

काळ आला खानाचा – वेळ चुकली


कथा रोमांचकारक घडलेली – 
काळ आला खानाचा – वेळ चुकली ! ध्रु. 

व्‍हावी खानाची भेट 
गेले सरळ थेट 
अम्‍ही खानाचे, अम्‍ही बादशहाचे 
बतावणी बेमालूम साधलेली ! १ 

समदे जीवलग 
करती लगबग 
सारे योजिलेले, सारे आखलेले 
काळाची चाहुल कुणा नाही लागली ! २  

वाट पाहायाची 
चाहूल लागायाची 
खानसाम्‍यांची घटिका भरलेली 
बंद दिंडी ती अलगद उघडली ! ३ 

खान हवा हवा 
कुठे धरी दबा 
कोण आले इथे, कसे आले इथे 
काय भुते खेळती लाल महाली ! ४ 

जीव मुठीत धरून 
खान लपे बसुन 
तशा अंधारात घाव राजा घाली 
उजव्‍या हाताची तीन बोटं तुटली ! ५ 

गनीम आया, आया 
गनीम गया, गया 
मोगली गोंधळ पथ्‍यावरी, पथ्‍यावरी 
भुते पसार समदी झालेली ! ६ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले

No comments:

Post a Comment