Monday, May 1, 2023

अर्जुना इतुके करशिल ना?

अर्जुना इतुके करशिल ना?ध्रु.

मन चंचल हे तू जे म्हणसी
असत्य लेशही तू न सांगशी
गोडि जयाची त्या लावावी 
तेथे रमते ना?१

मन निर्मळ हे करता करता
मंदिर बनते बघता बघता
विकारवादळ शमवित भक्ती
श्रद्धा धरशिल ना?२

आठ प्रहरांमधे जरासा
ध्यानाचा धरि छंद मधुरसा
अस्थिर गमते ते स्थिर होते
प्रत्यय घेशिल ना?३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१७..०७.१९७४
(अथवा हे चित्त मनबुद्धिसहित
माझ्या हाती अचुंबित न शकसी देवो
तरि गा ऐसे करी यया आठा पहारामाझारी
मोटके निमिषभरी देतु जाय

या ज्ञानेश्वरीतील ओवीवरील काव्य)
ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या स्वामी माधवनाथांच्या विवरणावर आधारित

No comments:

Post a Comment