श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ । ध्रु.
देह लोटला अपुल्या चरणी, गंगा यमुना नेत्रांमधुनी
हात फिरवला पाठीवरुनी, गोड झिणझिण्या कायेमधुनी
नरजन्म न व्यर्थ । १
स्वामी आपण रोखुन बघता, पापे जळली राखच उरता
त्या राखेला भस्म समजता, कवच जाहले भक्ताकरता
मग चिंता कमर्थ? २
देहामध्ये का गुंतावे? कल्पित भय का उरी धरावे?
मी माझे का घट्ट धरावे? क्रोधाने का मीच जळावे?
नाम एक सत्य। ३
अशक्य जगती काही नाही, यत्न नराला वरती नेई
कष्टाविण यश कोणा नाही, श्रद्धेवाचुन जीवन नाही
सदाचरण पथ्य । ४
सुधारणा केव्हाही होते, पश्चात्तापे वृत्ति पालटे
मार्गावरती चालता नेटे राघव भेटे, माधव भेटे
सांगत गुरुनाथ। ५
No comments:
Post a Comment