Sunday, June 18, 2017

दिंडी चालली चालली पंढरीला....

दिंडी चालली चालली पंढरीला 
ज्ञानबा तुकाराम ! ज्ञानबा तुकाराम ! ध्रु. 

असो उन वा पाऊस वारा 
पांडुरंग करि पाहुणचारा 
भक्ति सुखाचे धाम ! १ 

अभंग गाता हरिपाठाचे 
विठ्ठल आपुल्या मनात नाचे 
दासाचा श्रीराम ! २ 

देहु आळंदीची गोडी 
वर्णाया भाषाच तोकडी 
भाविक घेई नाम ! ३ 

गीता मुरली श्रीकृष्णाची 
ज्ञानदीपिका ज्ञानेशाची 
देत मना विश्राम ! ४ 

परस्परांच्या पाया पडती 
उरा उरी जन असे भेटती 
विना दाम हो काम ! ५ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

No comments:

Post a Comment