भूपाळी
प्रभात झाली मनी जागा हो
ज्ञानबा – तुकाराम ! ध्रु.
आळंदी मज बोल बोलवी
देहु मोदे डोल डोलवी
अनुभव अभिराम ॥ १ ॥
भावभक्तिची नदी झुळझुळे
नयनी प्रेमाश्रुही झरले
गंधित मम धाम ॥ २ ॥
सुमधुर वीणा कोण छेडते
किणकिण झांजेचीही येते
अनावरच नाम ॥ ३ ॥
ओवी अभंग एका वेळी
तशी विराणी कानी आली
समाधि विश्राम ॥ ४ ॥
दुरितांचे हे तिमिर जाउ दे
विसर न आपुला कधी पडु दे
विनवी श्रीराम ॥ ५ ॥
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
No comments:
Post a Comment