आरती ज्ञानबा तुकारामा!
आलो शरण तुम्हा, द्या मज प्रेमा
ज्ञानबा तुकारामा ! ध्रु.
इंद्रायणीच्या काठी
दोघांची वस्ती
मनी भरून वाहे भीमा !१
माझे ज्ञानाई आई
तुकाई आई
नसे अगाध प्रेमा सीमा !२
ओवी सप्रेम गाऊ
अभंग गाऊ
लावा अज्ञान जीवा नामा !३
बुक्का कपाळी लागे
विठ्ठल जागे
वैकुंठ आणता धामा !४
देता नामाची जोड
संसार गोड
रामा न वानवे महिमा !५
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
No comments:
Post a Comment